लातूर जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी अधिसूचना जारी; वर्षभरात मिळणार १५ दिवसांची सूट

लातूर जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी अधिसूचना जारी; वर्षभरात मिळणार १५ दिवसांची सूट लातूर, दि. १७ : ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रांच्या वापराबाबत अधिसूचना जारी केली आहे. श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी वर्षभरात १५ दिवस ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक/ध्वनिवर्धक वापरण्याची सूट देण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा १ दिवस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा १ दिवस, श्रीगणेश उत्सव काळात पाचवा गौरी विसर्जन, सातवा, अनंत चतुर्दशीचा आदला दिवस व अनंत चतुर्दशी असे एकूण ४ दिवस, नवरात्र उत्सव काळात अष्टमी व नवमी असे २ दिवस, दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन व दिवाळी पाडवा असे २ दिवस, ईद-ए-मिलादचा १ दिवस, ख्रिसमसचा १ दिवस आणि ३१ डिसेंबररोजी १ दिवस असे १३ दिवस आणि उर्वरित २ दिवस ध्वनी प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक लातूर यांच्या शिफारसीनुसार जिल्ह्यातील महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने सूट देण्यात येणार आहे. शांतता क्षेत्रासाठी ही सूट लागू राहणार नाही. अंमलबजावणीची जबाबदारी महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील, असेही अधिसूचनेत नमूद आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत