श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त २६ आणि २७ फेब्रुवारीला पशुपक्षी, अश्व-श्वान प्रदर्शन

श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त २६ आणि २७ फेब्रुवारीला पशुपक्षी, अश्व-श्वान प्रदर्शन लातूर, दि. १९ : श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त यात्रा समिती, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व लातूर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिध्देश्वर व रत्नेश्वर देवालय परिसरात २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पशुपक्षी प्रदर्शन आणि २७ फेब्रुवारी २०२६ रोजी अश्व व श्वान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यासाठीची नोंदणी त्या-त्या दिवशी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत करण्यात येणार असून त्यानंतर निवड प्रक्रीया करण्यात येईल, असे लातूर पंचायत समितीमार्फत कळविण्यात आले आहे. पशु प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांचे स्वास्थ दाखला प्रमाणपत्र घ्यावे. पशुप्रदर्शनातील सहभागी पशुधनांच्या कानात १२ अंकी पशु आधार नंबर असणे बंधनकारक राहील. पशुधन व श्वान, अश्व गटांची नोंदणी त्या-त्या दिवशी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंतच केली जाईल. कुठल्याही परिस्थितीत सकाळी ११ वाजल्यानंतर पशुधनाची नाव नोंदणी केली जाणार नाही. सकाळी ११ ते दुपारी ३ वा.पर्यंतची वेळ पशुधन निवडीसाठी राखीव राहील. प्रत्येक गटातील पशुधनास प्रथम, द्वितीय, तृतीय व ग्रेड नुसार अ, ब, क, ड अशा प्रकारे बक्षिस वितरीत करण्यात येईल. प्रत्येक गटात १० पशुधनाचा सहभाग बंधनकारक राहिल अन्यथा तो गट होणार नाही व त्या गटातील पशुधनास ग्रेड प्रमाणे अ, ब, क, ड या प्रमाणे बक्षिस वाटप करण्यात येईल. सहभागी पशुपालकांना बक्षिसाची रक्कम संगणक प्रणाली आरटीजीएसद्वारे अदा करण्यात येईल. त्यासाठी नोंदणी करताना आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत देणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत बक्षिसाची रक्कम रोख स्वरुपात दिली जाणार नाही. पशुपालकांनी आपले बहुमुल्य पशुधन व्यवस्थित दोरखंडाने बांधून आपल्या जबाबदारीने ठेवावे. निवड प्रक्रिया पारदर्शक असून निवड समितीचा निर्णय हा अंतिम राहील. निवड समिती अधिकारी, कर्मचारी यांच्याशी हुज्जत अथवा वाद घालणे, यासारखा अनुचित प्रकार आढळल्यास संबंधित पशुपालकाची नोंदणी रद्द करण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत सर्वोत्तम पशुधन (चॅम्पियन) निवडला जाणार नाही, असे लातूर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. जे. पी. वाघमारे यांनी कळविले आहे. प्रशु प्रदर्शनामध्ये खालील प्रमाणे गट स्थापन करण्यात येतील देवणी नर गट- देवणीनर १ वर्षाखालील वासरे, देवणीनर १ वर्षावरील वासरे, देवणीनर २ दात वळू, देवणीनर ४ दात वळू, देवणीनर ६ दात वळू. देवणी मादी गट- देवणी मादी १ वर्षाखालील वासरे, देवणी कालवड १ वर्षावरील, देवणी गाभण कालवड, देवणी गाभण गाय, देवणी दुधाळ गाय. लाल कंधारी नर गट- लालकंधारी नर १ वर्षाखालील वासरे, लालकंधारी नर १ वर्षावरील वासरे, लालकंधारी नर २ दात वळू, लालकंधारी नर ४ दात वळू, लालकंधरी नर ६ दात वळू. लाल कंधारी मादी गट- लालकंधारी मादी १ वर्षाखालील वासरे, लालकंधारी कालवड १ वर्षावरील, लालकंधरी गाभण कालवड, लालकंधारी गाभण गाय, लालकंधारी दुधाळ गाय. संकरीत मादी गट- संकरीत मादी १ वर्षाखालील वासरे, संकरीत कालवड १ वर्षावरील, संकरीत गाभण गाय, संकरीत दुधाळ गाय. म्हैस गट- नर, मादी अश्व गट नर- अदात, २ दातावरील. अश्व मादी गट- अदात, २ दातावरील. श्वान गट- प्रजातनिहाय कुक्कुट गट- देशी कोंबडी विदेशी कोंबडी उस्मानाबादी शेळी गट- तीन पिल्ले व त्यावरील पिल्लांची उस्मानाबादी शेळी. ****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित