सुरक्षित इंटरनेट दिन विशेष... ऑनलाईन सुरक्षिततेसाठी घ्या खबरदारी !
सुरक्षित इंटरनेट दिन विशेष...
ऑनलाईन सुरक्षिततेसाठी घ्या खबरदारी !
सुरक्षित इंटरनेट दिन हा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात साजरा केला जातो. या दिनाचा उद्देश विशेषतः मुले व तरुणांमध्ये इंटरनेटचा सुरक्षित, जबाबदार आणि सकारात्मक वापर करण्याबाबत जनजागृती निर्माण करणे हा आहे. तसेच, दरवर्षी उद्भवणाऱ्या नवीन ऑनलाईन समस्या व सध्याच्या सायबर सुरक्षेशी संबंधित आव्हानांबाबत समाजामध्ये जागरूकता वाढविणे हा देखील या दिनाचा महत्त्वाचा हेतू आहे.
शासकीय कामकाजात सायबर सुरक्षेचे वाढते महत्त्व लक्षात घेता, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी), जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या वतीने “सिक्युअर युवर अकाऊन्टस” ही विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश सर्व शासकीय कार्यालये, बँका, खाजगी संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या ऑनलाईन खात्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक करणे हा आहे.
सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स :
१) इंटरनेट सुरक्षेसाठी टिप्स :
केवळ विश्वसनीय व अधिकृत संकेतस्थळेच वापरा; कोणताही दुवा (Link) उघडण्यापूर्वी त्याची खात्री करा.
HTTPS असलेल्या वेबसाइटचा वापर करा – URL च्या सुरुवातीस https:// असल्याची खात्री करा.
सार्वजनिक Wi-Fi वापरताना सावधगिरी बाळगा; शक्य असल्यास VPN चा वापर करा.
मोबाईल, संगणक व अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नेहमी अद्ययावत (Update) ठेवा.
२) पासवर्ड सुरक्षेसाठी टिप्स :
मजबूत (Strong) पासवर्ड वापरा – किमान १२ अक्षरे, मोठी-लहान अक्षरे, अंक व विशेष चिन्हांचा समावेश असावा.
प्रत्येक खात्यासाठी वेगळा पासवर्ड वापरा.
पासवर्ड ३ ते ६ महिन्यांतून एकदा बदला.
Two-Factor Authentication (2FA) अनिवार्यपणे सक्रिय ठेवा.
३) बँक खात्यांची सुरक्षितता :
OTP, PIN, CVV कोणालाही सांगू नका.
फिशिंग ई-मेल, बनावट SMS व फोन कॉलपासून सावध रहा.
बँकेच्या अधिकृत अॅपद्वारेच व्यवहार करा; थर्ड-पार्टी अॅप टाळा.
नेट बँकिंग व मोबाईल वॉलेटसाठी मजबूत पासवर्ड वापरा.
४) UPI पेमेंट सुरक्षिततेसाठी टिप्स :
अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या UPI रिक्वेस्ट स्वीकारू नका.
UPI PIN फक्त पैसे पाठवण्यासाठी असतो, पैसे मिळवण्यासाठी नाही.
फसवणुकीच्या कॉल्स किंवा मेसेजेसना प्रतिसाद देऊ नका.
Google Pay, PhonePe, Paytm इत्यादी अॅप्समध्ये सुरक्षा सेटिंग्ज सक्षम ठेवा.
५) सोशल मीडिया खात्यांची सुरक्षितता :
वैयक्तिक व संवेदनशील माहिती सार्वजनिक करू नका.
मजबूत पासवर्ड वापरून 2FA सुरू ठेवा.
फसव्या ऑफर्स, बक्षिसे व संशयास्पद लिंकपासून दूर रहा.
Facebook, Instagram, X (Twitter) इत्यादी प्लॅटफॉर्मवर Login Alerts सक्रिय ठेवा.
सुरक्षित व विश्वासार्ह सायबर अवकाश निर्माण करण्याच्या उद्देशाने, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत Information Security Education and Awareness (ISEA) प्रकल्प – टप्पा III राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत सायबर स्वच्छता व सायबर सुरक्षेबाबत (Cyber Aware Digital Citizen) जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांद्वारे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच शासकीय कर्मचारी यांना लक्ष्य केले जाते.
ISEA प्रकल्पांतर्गत सुरक्षित इंटरनेट दिन – १० फेब्रुवारी २०२६ निमित्त संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी आवश्यक जागरूकता साहित्य https://staysafeonline.in/safer-internet-day येथे उपलब्ध आहे. सर्व नागरिकांनी व शासकीय कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन ऑनलाईन सुरक्षितता वाढवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
—
जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,
जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर
Comments
Post a Comment