इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी श्री केशवराज विद्यालय येथील परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मठपती यांच्यासह केंद्र संचालक व अधिकारी उपस्थित होते.

इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी श्री केशवराज विद्यालय येथील परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मठपती यांच्यासह केंद्र संचालक व अधिकारी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा केंद्रावर अचानकपणे भेट देण्यासाठी भरारी पथकाची व कायमस्वरूपी बैठे पथकाची व्यवस्था करण्यात आली असून, कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक दक्षता घेतली आहे. जिल्ह्यातील १५२ परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीची परीक्षा होत असून ३९ हजार २४२ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. प्रत्येक विषयाच्या पेपरसाठी १५२ केंद्रासाठी महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि इतर विभागांच्या समन्वयातून १५२ त्रिसदस्यीय बैठी पथके गठीत करण्यात आली आहेत, ती रोटेशन पद्धतीने कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. ही पथके पूर्ण वेळ कार्यरत राहणार आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मागर्दर्शनाखाली तयार करण्यात आलेली महसूल अधिकारी, जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुख यांची 70 भरारी पथके परीक्षा कालावधीत विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेट देवून पाहणी करणार आहेत. परीक्षा कालावधीत सर्व परीक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. **

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत