छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण लातूर, दि. १९ : शिवजयंतीनिमित्त जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सर्व उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. **

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत