केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा २५ व २६ फेब्रुवारी रोजीचा दौरा कार्यक्रम

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा २५ व २६ फेब्रुवारी रोजीचा दौरा कार्यक्रम लातूर, दि. २४ : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे २५ व २६ फेब्रुवारी २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री. आठवले यांचे २५ फेब्रुवारी, २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे आगमन होईल. अहमदपूर येथील काळेगाव रोडवरील कमला नेहरू शाळेजवळील भाऊसाहेब वाघंबर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता अहमदपूर येथील विद्युत कॉलनीतील बाबासाहेब कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. सायंकाळी ५.३० वाजता उदगीर येथील राजनगर मधील देविदास कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. सायंकाळी ६ वाजता उदगीर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. सायंकाळी ६.३० वाजता उदगीर येथून लातूरकडे प्रयाण करतील. रात्री ७.५० वाजता लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम. केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले हे २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.१५ वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासमवेत केद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या योजनांविषयी आढावा बैठक घेतील. दुपारी १२ वाजता औसा तालुक्यातील टाका येथील पाटोळे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील. दुपारी १.३० वाजता किल्लारी साखर कारखाना येथील विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी २.४५ वाजता किल्लारी येथील तक्षशीला बौद्धविहार येथे बौध्द धम्म परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सायंकाळी ५ वाजता त्यांच्या उपस्थितीत अहमदपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जाहीर सभा होईल. सायंकाळी ६ वाजता अहमदपूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत