लातूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १८ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन · सर्वांना विनामुल्य प्रवेश; कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे

लातूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १८ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन · सर्वांना विनामुल्य प्रवेश; कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे लातूर, दि. १६ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर येथील बार्शी रोडवरील दयानंद सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे. यावेळी ‘आम्ही जिजाऊच्या लेकी’ या कार्यक्रमांतर्गत शिवचरित्र, शाहिरी पोवाडे, स्फुर्तीगीते व लोकगीतांचे सादरीकरण केले जाणार आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची गौरवगाथा, त्यांचा पराक्रम व प्रेरणादायी जीवन नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत