भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाईन अर्ज नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर अंतिम मुदत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाईन अर्ज नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर अंतिम मुदत · पात्र विद्यार्थ्यांनी महा-आयटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत लातूर, दि. १६: अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्जांच्या नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज महाआयटी पोर्टलवर सादर करावेत, असे आवाहन लातूर येथील समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २६ डिसेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार या योजनेत सुधारणा करण्यात आल्या आहेत. सन २०१७ पासून सुरू असलेल्या या योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना आणि अटी-शर्ती शासनाच्या स्तरावरून निश्चित करण्यात आल्या असून, सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर माहितीसाठी उपलब्ध आहे. शासकीय निर्णयातील सर्व अटी व शर्तींच्या अनुषंगाने, ज्या पात्र विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ मध्ये महा-आयटी पोर्टलवरून स्वाधार योजनेचा लाभ घेतला आहे आणि जे विद्यार्थी सध्या त्याच अभ्यासक्रमाच्या पुढील वर्षात शिक्षण घेत आहेत, अशाच विद्यार्थ्यांना २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन अर्ज नूतनीकरण करता येणार आहे. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी महा-आयटी पोर्टलवर आपले नूतनीकरणाचे अर्ज वेळेत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत