विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरी सणानिमित्त दोन दिवस बंद

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरी सणानिमित्त दोन दिवस बंद लातूर, दि. ११ : येत्या सोमवारी, १४ सप्टेंबर, २०२६ रोजी गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने तसेच शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२६ रोजी लातूर जिल्ह्यात जेष्ठा गौरी सणानिमित्त स्थानिक सुट्टी असल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद राहील. तसेच सलग सुट्टी जोडून आलेली असल्यामुळे रविवार, १३ सप्टेंबर व गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२६ रोजी बाह्यरुग्ण विभाग नियमित वेळेत सुरु राहील. बाह्यरुग्ण विभाग दोन दिवस बंद असला, तरी रुग्णालयाची आपत्कालीन सेवा २४ तास अविरत सुरू राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत