Posts

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा •       वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ 

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा •       वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ  लातूर, दि. १६  : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलींचे व मुलांचे १०० विद्यार्थी क्षमतेचे प्रत्येकी एक वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांची भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य याची निःशुल्क व्यवस्था करण्यात येते. सन २०२६-२७ साठी रिक्त असलेल्या जागेवर वसतिगृह प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यास ३० सप्टेंबर, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र,  तसेच जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांन...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. १६ (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत, ज्यामध्ये मुलांची १४ आणि मुलींची १२ वसतिगृहे समाविष्ट आहेत. यापैकी लातूर शहरात मुलांची ६ व मुलींची ४ वसतिगृहे असून औसा, निलंगा, उदगीर, देवणी आणि चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे १ व मुलींचे १ वसतिगृह सुरू आहे. तसेच अहमदपूर येथे मुलांची २ व मुलींची २, रेणापूर येथे मुलांचे १ आणि जळकोट येथे मुलींचे १ वसतिगृह कार्यरत आहे. या सर्व शासकीय वसतिगृहांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू असून, इच्छुक विद्यार्थी प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org या नवीन लिंकचा वापर करून आपले अर्ज भरू शकतात. जिल्ह्यात इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या, तसेच बिगर-व्यावसायिक पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) हे प्रवेश अर्ज भरता येतील. तसेच अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीच्या (म...

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालतचे लातूर जिल्ह्यात ३० सप्टेंबर रोजी आयोजन

  ·          प्रलंबित अर्धन्यायिक महसुली प्रकरणांचा तडजोडीने होणार निपटारा लातूर, दि. १४ (जिमाका): राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी , तहसीलदार , उपविभागीय अधिकारी , उपजिल्हाधिकारी , अपर जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनींशी संबंधित प्रलंबित असलेले विविध महसुली दावे व अपीले सामंजस्याने व कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी लातूर जिल्ह्यात येत्या ३० सप्टेंबर २०२६ रोजी महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून तसेच त्यांच्या सामाजिक न्याय व शेतकरी कल्याणाच्या मूळ विचारांना स्मरून हे अभियान राज्यभरात राबविण्यात येत आहे. महसुली दाव्यांमध्ये एका स्तरावर निकाल लागल्यानंतर निकाल विरोधात लागलेले पक्षकार वरिष्ठ न्यायालयात अपील किंवा पुनरीक्षण अर्ज दाखल करतात , ज्यामुळे हे दावे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. विधी सेवा प्राधिकरणाच्या लोक अदालतीच्या धर्तीवर म...

भरती परीक्षा सुधारणांसाठी अभिप्राय, सूचना जिल्हास्तरीय विशेष कक्षात १८ सप्टेंबरपर्यंत सादर करता येणार

लातूर, दि. १४ (जिमाका) : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे २१ सप्टेंबर २०२६ रोजी कामाच्या अनुषंगाने ही समिती भेट देणार आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आस्थापना शाखा येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कामकाजासाठी खुला राहील. याठिकाणी नागरिक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष सादर करू शकतात. समितीच्या छत्रपती संभाजीनगर येथील भेटी दरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे समिती संवाद साधणार आहे. तसेच ज्या नागरिकांना प्रत्यक...

भरती परीक्षा सुधारणांसाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्सचा २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यव्यापी संवाद

भरती परीक्षा सुधारणांसाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्सचा २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यव्यापी संवाद • विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद • सूचना, अभिप्राय स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर विशेष कक्ष लातूर, दि. १२ (विमाका) : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथे २१ सप्टेंबर २०२६ रोजी टास्क फोर्सचा संवाद दौरा होणार आहे. या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागासाठी २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्र...

लातूर जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी आयोजित विशेष शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन दिवसांत १४२ अर्ज दाखल

Image
लातूर जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी आयोजित विशेष शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन दिवसांत १४२ अर्ज दाखल लातूर, दि. ११ : जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे अधिक सुलभ व जलद व्हावे, या उद्देशाने लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर संबंधित तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त पथकांद्वारे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या पहिल्या दोन दिवसांत, म्हणजेच १० आणि ११ सप्टेंबर २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकूण २१ विशेष शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण १४२ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती या अभियानाच्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी केले आहे. तालुकानिहाय आकडेवारीनुसार, लातूर तालुक्यात ६ शिबिरांच्या माध्यमातून सर्वाधिक ११८ अर्ज प्राप्त झा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६; लातूर जिल्ह्यातील ८,७३९ शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६; लातूर जिल्ह्यातील ८,७३९ शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध लातूर, दि. ११ : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील एकूण ८१२ गावांमधील ८,७३९ शेतकरी सभासदांचा विशिष्ट क्रमांकासह समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २,०२८ सभासद असून उर्वरित ६,७११ सभासद राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे आहेत. ही यादी प्रमाणीकरणासाठी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेद्वारे १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरीत झालेल्या, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित/फेरपुनर्गठित कर्जास रुपये दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जात आहे. या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे केली जात असून, यासाठी शासनाने म...