'लोकसंवाद२०२६' या उपक्रमांतर्गत मुरुड येथे मार्गदर्शन

माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या 'लोकसंवाद२०२६' या उपक्रमांतर्गत #लातूर तालुक्यातील #मुरुड येथील महाराज गणेश मंडळ येथे नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवा, उद्योग क्षेत्रातील संधी आणि खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.


यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे यांनी खादी ग्रामोद्योग व उद्योग विभागांतर्गत मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि सवलतींची माहिती दिली. तसेच, मुरुड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ठोंबरे, आरोग्य मित्र धनंजय नवगिरे आणि गोविंद सुरवसे यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


​#गणेशोत्सव 

​#लोकसंवाद२०२६

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत