Posts

Showing posts from August, 2023

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नोव्हेंबरमध्ये ‘प्रगतीशील महाराष्ट्र उन्नती की एक पहेल’ प्रदर्शन

                                 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नोव्हेंबरमध्ये ‘प्रगतीशील महाराष्ट्र उन्नती की एक पहेल’ प्रदर्शन लातूर ,   दि.   31  ( जिमाका):   भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ‘प्रगतीशील महाराष्ट्र उन्नती की एक पहेल’ या प्रदर्शनाचे लातूर येथे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी म. शं. दुशिंग यांनी दिली आहे. या प्रदर्शनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन स्तरावर स्टॉल, कार्यशाळा, शासनाच्या विविध योजनांची माहिती, विविध शेतकरी उत्पादक गट, महिला बचत गट, सर्वसामान्य जनता यांचे प्रदर्शनास भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे, असे जिल्हा नियोजन अधिकारी श्री. दुशिंग यांनी कळविले आहे. *****

उत्पादनात 50 टक्के पेक्षा अधिक घट आढळल्यास पीक विमा कंपनीला 25 टक्के अग्रिम वितरणाच्या देणार सूचना

                                   उत्पादनात 50 टक्के पेक्षा अधिक घट आढळल्यास पीक विमा कंपनीला 25 टक्के अग्रिम वितरणाच्या देणार सूचना लातूर ,   दि.   31  ( जिमाका):   जिल्ह्यात एकूण 60 महसूल मंडळांपैकी 31 मंडळांमध्ये पावसाचा खंड पडल्याने त्याचा परिणाम पीक वाढीवर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय आढावा समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार हंगाम मध्य परिस्थितीचे सर्वेक्ष सुरु करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्पादनात 50 टक्केपेक्षा अधिक घट झाल्याचे दिसून आल्यास 25 टक्के अग्रिम शेतकऱ्यांना वितरीत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये विमा कंपनीला कळविण्यात येईल, असे जिल्हास्तरीय आढावा समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे. *****

कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन   लातूर दि. 31 (जिमाका) : कृषि विभागामार्फत सन २०२२ या वर्षामध्ये कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती, गट,   संस्था यांना पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. या कृषि पुरस्कारांसाठी शेतकरी, गट, संस्था, व्यक्ती यांनी आपले प्रस्ताव नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे १० सप्टेंबर २०२३ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी केले आहे. तसेच विविध कृषी पुरस्कार विषयक अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. कृषि विभागामार्फत राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणा-या शेतकऱ्यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, सेंद्रीय शेती कृषिभूषण, उद्यानपंडीत, वसंतराव नाईक शेतीम...

विद्यार्थ्यांनो, अंमली पदार्थांपासून दूर राहून करिअरवर लक्ष द्या !

    ·          जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे आवाहन ·          औषध विक्रेत्यांनी ‘नो मेडिसिन, विदाउट प्रिस्क्रिप्शन’चे पालन करावे ·          औषध विक्री दुकानांची तपासणी करण्यासाठी भरारी पथके नेमणार   लातूर ,   दि.   29 ( जिमाका): ‘एज्युकेशन हब’ अशी लातूरची ओळख असून राज्यभरातून विद्यार्थी या शहरात शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ, नशा येणाऱ्या औषधांपासून दूर राहून आपल्या जीवनातील ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. आज झालेल्या अंमली पदार्थविरोधी समितीच्या बैठकीनंतर त्यांनी हे आवाहन केले.   औषध विक्रेत्यांनी ‘नो मेडिसिन , विदाऊट प्रिस्क्रिप्शन ’ तत्वाचे पालन करावे. कोणालाही प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विक्री करू नयेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी दिल्या. तसेच नियमाची कठोर अंमलबजावणी होण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात येणार असल्याची माह...

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

                                  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन         लातूर ,   दि.   29  ( जिमाका):  जिल्ह्यात  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुलांची 13 व मुलीचे 12 अशी एकूण 25 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया यावर्षी ऑनलाईन पध्दतीने सुरु झाली आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी  http://www.hostel. mahasamajkalyan.in   या लिंकचा वापर करून केवळ व्यावसायिक अभ्यासक्रम व आयटीआय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी प्रवेशाचे वेळापत्रक ,  रिक्त जागेचा तपशिल ,  प्रवेशासाठी नियम ,  अटी व शर्ती यांची माहिती घेवून 20 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज भरु शकतील. प्रवेश अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात व्यावसायिक अभ्यासक्रम व आयटीआय अभ्यासक्रमाचे पदवी ,  पदविका प्रथम वर्षात, पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल...

अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांचा होणार विशेष गौरव

                                            अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांचा होणार विशेष गौरव ·          दहा हजार रुपये, 25 हजार रुपयांचा पुरस्कार लातूर ,   दि.   29  ( जिमाका):  जिल्ह्यातील अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, सैनिक पत्नी व पाल्यांचा विशेष गौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. एकरकमी दहा हजार रुपये, 25 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी कळविले आहे. राष्ट्रीय ,  आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य ,  संगीत ,  गायन ,  वादन ,  नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते ,  पुरस्कारप्राप्त यशस्वी उद्योजक, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे ,  पूर ,  जळीत ,  दरोडा ,  अपघात अथवा इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे , ...

स्लरी फिल्टर संयंत्रासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान

  स्लरी फिल्टर संयंत्रासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान ·          पंचायत समितीमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत लातूर ,   दि.   28  ( जिमाका):  रासायनिक खाते व कीटकनाशकांचा वापर कमी व्हावा, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमिनीची सुपीकता वाढावी, यासाठी सेंद्रिय खताचा वापर होणे आवश्यक आहे. यासाठी सुधारित कृषि पध्दतीच्या प्रात्यक्षिक अंतर्गत शेतकऱ्यांसाठी स्लरी फिल्टरचे प्रात्यक्षिक आयोजित करण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर डीबीटी तत्वावर स्लरी फिल्टर देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित पंचायत समितीमध्ये 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यांनी केले आहे. स्लरी फिल्टरसाठी या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील शेतकरी व महिला शेतकरी यांना प्राधान्य राहणार आहे. शेतकऱ्यांनी स्‍वतःचा सातबारा ,  आठ अ ,  आधार कार्ड ,  बँक पासबुकाच्‍या प्रथम पानाची छायांकि...

लातूरमध्ये महिला आयोगाच्या सुनावणीत 93 तक्रारींचा निपटारा राज्यातील 28 जिल्ह्यात जावून राज्य महिला आयोगाने महिलांच्या सुमारे अठरा हजार तक्रारींचा निपटारा केला - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर

Image
  लातूरमध्ये महिला आयोगाच्या सुनावणीत 93 तक्रारींचा निपटारा राज्यातील 28 जिल्ह्यात जावून राज्य महिला आयोगाने महिलांच्या सुमारे अठरा हजार तक्रारींचा निपटारा केला -   राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर लातूर ,   दि.   28 ( जिमाका): महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने सर्वच महिलांना आपले प्रश्न आयोगाकडे मांडता येत नाहीत. त्यामुळे ' महिला आयोग आपल्या दारी ' या उपक्रमांतर्गत राज्यातील 28 जिल्ह्यात महिला आयोग पोहचला आहे. या माध्यमातून जवळपास 18 हजार प्रकरणांमध्ये महिलांना न्याय मिळवून दिला गेला. महिलांच्या न्यायासाठी शासनानी केलेले कायदे महिलांपर्यंत जावेत. महिलांनी ते प्रयत्नपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करावा, हेही या उपक्रमातून आम्ही सांगत आहोत, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आज लातूर येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित जनसुनावणीप्रसंगी श्रीमती चाकणकर बोलत होत्या. या जनसुनावणीमध्ये महिलांच्या...

लातूरमध्ये महिला आयोगाच्या सुनावणीत 93 तक्रारींचा निपटारा

Image
  राज्यातील 28 जिल्ह्यात जावून राज्य महिला आयोगाने महिलांच्या सुमारे अठरा हजार तक्रारींचा निपटारा केला -   राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर लातूर ,   दि.   28 ( जिमाका): महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने सर्वच महिलांना आपले प्रश्न आयोगाकडे मांडता येत नाहीत. त्यामुळे ' महिला आयोग आपल्या दारी ' या उपक्रमांतर्गत राज्यातील 28 जिल्ह्यात महिला आयोग पोहचला आहे. या माध्यमातून जवळपास 18 हजार प्रकरणांमध्ये महिलांना न्याय मिळवून दिला गेला. महिलांच्या न्यायासाठी शासनानी केलेले कायदे महिलांपर्यंत जावेत. महिलांनी ते प्रयत्नपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करावा, हेही या उपक्रमातून आम्ही सांगत आहोत, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आज लातूर येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित जनसुनावणीप्रसंगी श्रीमती चाकणकर बोलत होत्या. या जनसुनावणीमध्ये महिलांच्या 93 तक्रारी दाखल झाल्या. तीन पॅनलच्या माध्यमातून या तक्रार...

लातूर येथे सैनिकी मुलींच्या वसतिगृहासाठी अशासकीय निवासी महिला पहारेकरी पदाची भरती

लातूर दि. 28 (जिमाका) :   जिल्हा   सैनिक   कल्याण कार्यालयाच्या आस्थापनेवरील लातूर येथील   सैनिकी   मुलींचे   वसतिगृहासाठी निवासी अशासकीय महिला पहारेकरी पद तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधन प्रतिमहा रक्कम 12 हजार   962 रुपये प्रमाणे भरण्यात येणार आहे.   या पदासाठी इच्छुक माजी सैनिक पत्नी अथवा विधवा, तसेच इतर महिला उमेदवारांनी 1 सप्टेंबर 2023 रोजी स्वतः अर्ज व मूळ कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सैनिक संकुल, एम.आय.टी. मेडिकल कॉलेज समोर, अंबाजोगाई रोड, लातूर येथे उपस्थित राहावे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारास तात्काळ कामावर घेण्यात येणार असल्याचे लातूरचे जिल्हा   सैनिक   कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी कळविले आहे.

स्लरी फिल्टर संयंत्रासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान

·        पंचायत समितीमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत लातूर, दि. 28 (जिमाका): रासायनिक खाते व कीटकनाशकांचा वापर कमी व्हावा, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमिनीची सुपीकता वाढावी, यासाठी सेंद्रिय खताचा वापर होणे आवश्यक आहे. यासाठी सुधारित कृषि पध्दतीच्या प्रात्यक्षिक अंतर्गत शेतकऱ्यांसाठी स्लरी फिल्टरचे प्रात्यक्षिक आयोजित करण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर डीबीटी तत्वावर स्लरी फिल्टर देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित पंचायत समितीमध्ये 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यांनी केले आहे. स्लरी फिल्टरसाठी या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील शेतकरी व महिला शेतकरी यांना प्राधान्य राहणार आहे. शेतकऱ्यांनी स्‍वतःचा सातबारा, आठ अ, आधार कार्ड, बँक पासबुकाच्‍या प्रथम पानाची छायांकित प्रत, लाभार्थीं अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमातीचे असल्‍यास जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग लाभार्थींसाठी दिव्यांगत्‍वाच्‍या दाखल्‍याच्‍या ...

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा लातूर दौरा

Image
  लातूर , दि. 26 ( जिमाका): महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या 27 व 28 ऑगस्ट 2023 रोजी दोन दिवसांच्या लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. श्रीमती चाकणकर यांचे 27 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता बीड येथून लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम. 28 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या उपस्थितीत लातूर शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी महिला शहर, जिल्हा कार्यकारणीची बैठक होईल. 28 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता श्रीमती चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात जनसुनावणी होईल. दुपारी दोन ते तीन राखीव. दुपारी तीन वाजता त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठक होईल. सायंकाळी पाच वाजता त्या पत्रकार परिषद घेतील. सायंकाळी सहा वाजता धायरी, पुणेकडे प्रयाण करतील.