सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

                                 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या

वसतिगृह प्रवेशासाठी 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

        लातूर, दि. 29 (जिमाका): जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुलांची 13 व मुलीचे 12 अशी एकूण 25 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया यावर्षी ऑनलाईन पध्दतीने सुरु झाली आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी http://www.hostel.mahasamajkalyan.in या लिंकचा वापर करून केवळ व्यावसायिक अभ्यासक्रम व आयटीआय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी प्रवेशाचे वेळापत्रकरिक्त जागेचा तपशिलप्रवेशासाठी नियमअटी व शर्ती यांची माहिती घेवून 20 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज भरु शकतील.

प्रवेश अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात व्यावसायिक अभ्यासक्रम व आयटीआय अभ्यासक्रमाचे पदवीपदविका प्रथम वर्षात, पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. महाविद्यलयाकडून थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी अर्ज भरता येईल. व्यावसायिक व आयटीआय अभ्यासक्रमासाठी अर्ज करावयाची मुदत 20 सप्टेंबर 2023 पर्यंत आहे. तरी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक व्यावसायिक व आयटीआय अभ्यसक्रमाच्या विद्यार्थ्यांनी http://www.hostel.mahasamajkalyan.in लिंकचा वापर करून तसेच स्थानिक गृहप्रमुख, गृहपाल यांच्याशी संपर्क साधून प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त  एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.

*****


Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा