लातूर येथे सैनिकी मुलींच्या वसतिगृहासाठी अशासकीय निवासी महिला पहारेकरी पदाची भरती
लातूर दि. 28 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आस्थापनेवरील लातूर येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहासाठी निवासी अशासकीय महिला पहारेकरी पद तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधन प्रतिमहा रक्कम 12 हजार 962 रुपये प्रमाणे भरण्यात येणार आहे.
या पदासाठी इच्छुक माजी सैनिक पत्नी अथवा विधवा, तसेच इतर महिला उमेदवारांनी 1 सप्टेंबर 2023 रोजी स्वतः अर्ज व मूळ कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सैनिक संकुल, एम.आय.टी. मेडिकल कॉलेज समोर, अंबाजोगाई रोड, लातूर येथे उपस्थित राहावे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारास तात्काळ कामावर घेण्यात येणार असल्याचे लातूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment