‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे -पालकमंत्री गिरीश महाजन
‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे
सहभागी व्हावे
-पालकमंत्री गिरीश महाजन
लातूर, दि. 9 (जिमाका) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता समारंभानिमित्त
जिल्ह्यात ‘अमृत सप्ताह’ अंतर्गत विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 9 ऑगस्ट या दिवशी ऑगस्ट क्रांती दिनापासून 'मेरी
माटी, मेरा देश' अर्थात 'माझी माती-माझा देश ' हे अभियान जिल्ह्यातील सर्व 786 ग्रामपंचायतींमध्ये
सुरु झाले आहे. यानिमित्ताने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत आयोजित होणाऱ्या विविध
कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री
गिरीश महाजन यांनी केले आहे.
मेरी माटी, मेरा देश’ अभियान गाव स्तरापासून
राष्ट्रीय स्तरापर्यंत राबविले जात आहे. प्रत्येक गावाची माती 9 ऑगस्ट रोजी कलशात एकत्र
जमा केली असून, त्या मातीतून अमृत वाटिका, अमृत वन निर्माण केले जाणार आहे. ही भारतीय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची चिरंतन आठवण म्हणून हे कायम राहणार आहे. 13 ऑगस्ट
ते 15 ऑगस्ट या कालावधीत 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व
नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री श्री. महाजन यांनी केले.
****
Comments
Post a Comment