ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

                                                            ग्रामपंचायत निवडणुकीसाठी

सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

 10 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी होणार प्रसिद्ध

लातूर, दि. 8 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाच्या 6 जुलै 2023 रोजीच्या आदेशानुसार जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि निधनराजीनामाअनर्हता किंवा इतर कारणांमुळे 30 जून 2023 अखेर रिक्त झालेल्या सदस्यथेट सरपंच पदांच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे.

यासाठी 1 जुलै 2023 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असून प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी 10 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध होईल. दिनांक 10 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 25 ऑगस्ट 2023 रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे श्री. महाडिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु