मराठवाडा मुक्तीसंग्राम व्याख्यानमाला जनकल्याण निवासी विद्यालयात भाऊसाहेब उमाटे यांनी उलघडला ­­­­मुक्तिसंग्रामाचा इतिहास

                                                             मराठवाडा मुक्तीसंग्राम व्याख्यानमाला

जनकल्याण निवासी विद्यालयात

भाऊसाहेब उमाटे यांनी उलघडला ­­­­मुक्तिसंग्रामाचा इतिहास

लातूर दि. 24 (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्रामाची शौर्यगाथा शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय आणि बाबासाहेब परांजपे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ ही 75 व्याख्यानांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक तथा इतिहास संशोधक भाऊसाहेब उमाटे यांचे व्याख्यान बुधवारी हरंगुळ येथील जनकल्याण निवासी विद्यालयात आयोजित करण्यात आले होते.

जनकल्याण निवासी विद्यालायचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, व्याख्यानमालेचे समन्वयक दिलीप कानगुले, विद्यालयाचे अधीक्षक दत्ताभाऊ माने यावेळी उपस्थित होते.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाची सुरुवात, स्वातंत्र्य सैनिकांनी उभारलेले लढे, लातूर जिल्ह्यात घडलेल्या घटना आणि त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान आदी विषयांवर मार्गदर्शन करून श्री. उमाटे यांनी विद्यार्थ्यांसमोर मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यातील विविध प्रसंग उलघडून सांगितले. विद्यार्थी, शिक्षक यावेळी उपस्थित होते.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा