उत्पादनात 50 टक्के पेक्षा अधिक घट आढळल्यास पीक विमा कंपनीला 25 टक्के अग्रिम वितरणाच्या देणार सूचना

                                  उत्पादनात 50 टक्के पेक्षा अधिक घट आढळल्यास

पीक विमा कंपनीला 25 टक्के अग्रिम वितरणाच्या देणार सूचना

लातूर, दि. 31 (जिमाका): जिल्ह्यात एकूण 60 महसूल मंडळांपैकी 31 मंडळांमध्ये पावसाचा खंड पडल्याने त्याचा परिणाम पीक वाढीवर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय आढावा समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार हंगाम मध्य परिस्थितीचे सर्वेक्ष सुरु करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणामध्ये उत्पादनात 50 टक्केपेक्षा अधिक घट झाल्याचे दिसून आल्यास 25 टक्के अग्रिम शेतकऱ्यांना वितरीत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये विमा कंपनीला कळविण्यात येईल, असे जिल्हास्तरीय आढावा समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा