लोकशाही दिनात आलेल्या प्रकरणावर एक महिन्याच्या आत कार्यवाही करावी - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे





लातूर, दि. 8 (जिमाका) : लोकशाही दिनात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांना स्थानिक पातळीवर अडचणी आल्या म्हणून ते त्यांची प्रकरण जिल्हा स्तरावर घेऊन येतात. त्यामुळे त्यांची प्रकरणे गांभीर्याने घेण्याची गरज असून जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्रकरण आल्यानंतर एक महिन्याच्या आत संबधित विभागाने यावर कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या कार्यकाळातील पहिला लोकशाही दिन झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार घुगे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक तसेच विविध विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

लोकशाही दिनाला सर्व विभागाच्या प्रमुखांनी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे सांगून संबंधित विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी लोकशाही दिन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी इथे जे-जे प्रकरणे लोकांकडून आलेले असतील, ते तुमच्याकडे येतील त्या प्रकरणांचा पाठपुरावा करून जिल्हाधिकारी कार्यालयास कळवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.

लोकशाही दिनातून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना फोन

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे ह्या प्रत्येक नागरिकांच्या तक्रारी वाचून, त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या त्या उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना सर्वांच्या समोर फोन करून हे काम का आडलं आहे? याची विचारपूस करून संबधित नागरिक उद्या तुमच्याकडे येतील, त्यावेळी त्यांच्याकडून हे प्रकरण समाजावून घेऊन कार्यवाही करावी, तसा अहवाल मला द्याव्या, अशा सूचना दिल्या.

******

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा