विद्यार्थ्यांनो, अंमली पदार्थांपासून दूर राहून करिअरवर लक्ष द्या !
·
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे आवाहन
·
औषध विक्रेत्यांनी ‘नो मेडिसिन, विदाउट प्रिस्क्रिप्शन’चे
पालन करावे
·
औषध विक्री दुकानांची तपासणी करण्यासाठी भरारी पथके
नेमणार
लातूर, दि. 29 (जिमाका): ‘एज्युकेशन
हब’ अशी लातूरची ओळख असून राज्यभरातून विद्यार्थी या शहरात शिक्षणासाठी येतात. या
विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ, नशा येणाऱ्या औषधांपासून दूर राहून आपल्या जीवनातील
ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा
ठाकूर-घुगे यांनी केले. आज झालेल्या अंमली पदार्थविरोधी समितीच्या बैठकीनंतर त्यांनी
हे आवाहन केले.
लातूर शहरात
28 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये नशेच्या गोळ्यांचा साठा
जप्त केला आहे. लातूरमध्ये शिक्षणासाठी बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची,
तरुणांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शहरात अंमली पदार्थ, नशा करण्यासाठी वापरण्यात
येणाऱ्या औषधांची विक्री होवू नये, यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. अशाप्रकारे
अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. तसेच
प्रिस्क्रिप्शन नसतानाही औषधांची विक्री करताना आढळणारे औषध विक्रेते, मेडिकल
रिप्रेझेंटेटिवज् आणि वितरक पोलीस तपासात दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई कली
जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिला.
******
Comments
Post a Comment