चाकूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तलाव मत्स्यव्यवसाय संस्थांना ठेक्याने देण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी सभा

 

चाकूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तलाव

मत्स्यव्यवसाय संस्थांना ठेक्याने देण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी सभा

लातूर, दि. 11 (जिमाका) : शासनाच्या 3 जुलै 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार 500 हेक्टर खालील जलक्षेत्र असलेल्या चाकूर तालुक्यातील जाणवळ आणि फत्तूनाईक तांडा, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उमरदरा येथील पाटबंधारे तलाव मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेसाठी (बोली) जाहीर लिलाव पद्धतीने ठेक्याने देण्यात येणार आहेत. यासाठी 24 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजता सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेमध्ये लातूर जिल्ह्यातील पाटबंधारे तलाव ठेक्याने देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. लिलावातील तलावाची न्युनतम ठेका रक्कम, तलाव ठेका सुरक्षा अनामत व वार्षिक इष्टतम मत्स्यबोटूकली संचयन किंमत १० टक्के रक्कम तसेच अटी शर्ती याविषयी माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, लातूर यांच्या कार्यालयात (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत पाहण्यास मिळेल.

पात्र संस्थेने बोली लिलाव प्रक्रियेत भाग घ्यावा. भाग घेणाऱ्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना शासन निर्णयानुसार अटी व शर्तीनुसार आवश्यक कागदपत्रे २४ ऑगस्ट, २०२३ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, लातूर या कार्यालयास सादर करावीत, असे आवाहन जिल्ह्याचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त जे. एस. पटेल यांनी केले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु