आदिवासी विकास विभागाच्या शाळा, वसतिगृहात 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन होणार साजरा

 

आदिवासी विकास विभागाच्या शाळा, वसतिगृहात

9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन होणार साजरा

लातूर, दि. 4 (जिमाका) : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण आमसभेच्या ठरावानुसार 9 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखाली कार्यालय, आश्रमशाळा, वसतिगृह, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येणार असल्याचे औरंगाबाद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

औरंबाद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अतंर्गत औरंगाबाद, लातूर, जालना व बीड या जिल्ह्यांचा समावेश असून 9 ऑगस्ट रोजी  जागतिक आदिवासी दिन’निमित्त कन्नड (जि. औरंगाबाद) येथील गौताळा रोडवरील डीडीएल लॉन्स येथे कार्यक्रम नियोजित आहे. या कार्यक्रमाला औरंगाबाद, लातूर, जालना व बीड या चारही जिल्ह्यातील सर्व आदिवासी बंधू व भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर, आधार कार्ड नोंदणी, जातीचे दाखले अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्राठी आवश्यक असणाऱ्या दस्तऐवजांविषयी माहिती शिबीराचे आयोजन तथा आदिवासी उपयोजना क्षेत्र व बिगर आदिवासी उपयोजना क्षेत्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहितीपर सत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे औरंगाबाद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु