महसूल सप्ताह अंतर्गत 5 ऑगस्ट रोजी सर्व तहसील कार्यालयात ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रम
लातूर, दि. 1 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, शहीद जवानाच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व त्यांचे अवलंबित यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महसूल विभागामार्फत 05 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता संबंधित तहसील कार्यालयात ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी सैनिकाच्या अडीअडचणी दूर करणे, त्यानां लागणारी प्रमाणपत्रे, दाखले व
इतर लाभ महसूल विभागामार्फत देण्याची कार्यवाही यावेळी केली जाणार आहे. तरी या
उपक्रमास आजी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, शहीद जवानाच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व
त्यांचे अवलंबित अर्जदारांनी स्वत: उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment