खरीप हंगाम-2023 पीक स्पर्धेचे आयोजन, शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 


                                                                                    
                  खरीप हंगाम-2023 पीक स्पर्धेचे आयोजन

शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

लातूर दि. 21 (जिमाका) : कृषि विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भातज्वारीबाजरीमकानाचणी (रागी)तूरसोयाबीनभुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी नोंदणी अर्ज सादर करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे. तरी या पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये व आदिवासी गटासाठी रक्कम दीडशे रुपये राहील. स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची  भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (एक एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्यजिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलनसातबाराआठ अ चा उताराजात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास)पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशाबँक खाते चेक अथवा पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अर्जासोबत जोडावी.

पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरूप-  सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी तालुका पातळी पहिले बक्षिस 5 हजारदुसरे 3 हजार व तिसरे 2 हजार रुपये राहील. जिल्हा पातळी पहिले बक्षिस 10 हजारदुसरे 7 हजार तिसरे 5 हजार राहील. तसेच राज्य पातळी पहिले बक्षिस 50 हजारदुसरे 40 हजारतिसरे बक्षिस 30 हजार रुपये राहील.

अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या गावचे कृषि सहाय्यककृषि पर्यवेक्षकमंडळ कृषि अधिकारी यांच्याशी किंवा संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन रेणापूर तालुका कृषि अधिकारी नितीन कांबळे यांनी केले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु