ऑनलाईन माहिती सादर करण्याचे आवाहन

 शासकीय कर्मचारी गणना 2023

सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी

ऑनलाईन माहिती सादर करण्याचे आवाहन

·         नोव्हेंबर, फेब्रुवारीच्या वेतन देयकासोबत प्रमाणपत्र जोडावे लागणार

           लातूर, दि. 10 (जिमाका) नियोजन विभागामार्फत शासकीय सेवेतील नियमित व नियमितेतर आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी (कार्याव्ययी आस्थापनेवरील, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी इत्यादी) तसेच तदर्थ तत्वावर नेमणुका करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या अधिकारी, कर्मचारी यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. यासाठी 1 जुलै 2023 दिनांकास  आस्‍थापनेवर कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी यांची इत्यंभूत माहिती तसेच माहे जुलै-2023 या महिन्याच्या संपूर्ण वित्तलब्धीची तपशीलवार माहिती जमा करण्यात येत आहे.

माहिती संकलित करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून संगणकीय आज्ञावली तयार करण्यात आली आहे. या आज्ञावलीत माहिती नोंदणीसाठी लॉगीन आयडी व पासवर्ड लातूर जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून संबंधित कार्यालय प्रमुखांना उपलब्ध करून देण्यात येतील. 17 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत हे लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करून घ्यावेत. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आहरण व संवितरण अधिकारी यांनी माहिती ऑनलाईन भरावे व जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावी. तसेच 1 डिसेंबर 2023 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्रुटींचे निवारण करून माहिती बरोबर असल्याचे जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. अधिकारी, कर्मचारी यांची माहिती भरल्यानंतर जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून मिळणारे प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर 2023 आणि माहे फेब्रुवारी 2024 च्या देयकासोबत जोडणे बंधनकारक आहे. याशिवाय वेतन देयके स्वीकारली जाणार नाहीत.

नियोजन विभागाच्या 8 ऑगस्ट 2023 रोजीच्या परिपत्रकातील वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही करून शासकीय कर्मचारी गणना 2023 बाबतचा माहितीकोष तयार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक उ. म. हत्ते आणि सहायक संशोधन अधिकारी एस. पी. बोदडे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु