सहकार विभागातील गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी 14 व 16 ऑगस्ट रोजी ऑनलाईन परीक्षा

                      सहकार विभागातील गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी

14 व 16 ऑगस्ट रोजी ऑनलाईन परीक्षा

·         सहकार विभागाच्या संकेतस्थळावर प्रवेशपत्र होणार उपलब्ध

लातूर, दि. 9 (जिमाका) सहकार विभागातील गट  संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी जुलै, 2023 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होतीत्यानुसार विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एसकंपनीमार्फत 14 ऑगस्ट, 2023 आणि 16 ऑगस्ट, 2023 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेया परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना अर्ज सादर करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक आणि -मेल आयडीवर पाठविण्यात आल्या आहेत.

प्रवेशपत्र डाऊनलोड करावयाची लिंक आणि याबाबतच्या सूचना सहकार आयुक्त  निबंधकसहकारी संस्थामहाराष्ट्र राज्यपुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेतया वरील संकेतस्थळावरील आणि परीक्षेचे प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करावेअसे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे व्ही.एलपोतंगले यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा