लातूर जिल्हा परिषदेमध्ये 476 पदांची होणार भरती 25 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारणार · इच्छुक उमेदवारांच्या मदतीसाठी हेल्पलाईन कार्यान्वित

 

लातूर जिल्हा परिषदेमध्ये 476 पदांची होणार भरती

·       25 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारणार

·       इच्छुक उमेदवारांच्या मदतीसाठी हेल्पलाईन कार्यान्वित

लातूर, दि. 4 (जिमाका) : ग्रामविकास विभागाचा 15 नोव्हेंबर 2022 रोजीचा शासन निर्णय आणि सामान्य प्रशासन विभागाचा 21 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार लातूर जिल्हा परिषदेंतर्गत विविध 19 संवर्गातील गट क मधील 476 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या पदांसाठी 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार असून इच्छुक उमेदवारांसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल यांनी दिली आहे.

लातूर जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य पर्यवेक्षकाची 3 पदे, आरोग्य सेवक (पुरुष) 22 पदे, आरोग्य सेवक (पुरुष) (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) 105 पदे, आरोग्य परिचारिका [आरोग्यसेवक (महिला)] 246 पदे, औषध निर्माण अधिकारी 07 पदे, कंत्राटी ग्रामसेवक 04 पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम/ग्रामीण पाणीपुरवठा) 24 पदे, कनिष्ठ अभियंता (विद्युत) 01 पद, कनिष्ठ आरेखक 03 पदे, कनिष्ठ यांत्रिक 01 पद, कनिष्ठ लेखा अधिकारी 02 पदे, कनिष्ठ सहाय्यक 04 पदे, कनिष्ठ सहाय्यक लेखा 05 पदे, मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका 10 पदे, पशुधन पर्यवेक्षक 23 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01 पद, लघुलेखक (उच्चश्रेणी) 01 पद, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 04 पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे) 10 पदे असे एकूण 476 पदे भरण्यात येणार आहेत. या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/   या लिंकवर दिनांक 25 ऑगस्ट, 2023 रोजीच्या रात्री 23.59 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. या जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जिल्हा परिषद लातूरच्या www.zplatur.gov.in या संकेतस्थमळावर पाहण्यास उपलब्ध आहेत.

भरती प्रक्रियेसाठी लातूर जिल्हा परिषदमध्ये हेल्पालाईन 02382-258969 सुरु करण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी भरतीच्या अनुषंगाने कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत संर्पक साधवा, असे अवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा