लातूर दि. 18 (जिमाका) : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे विभागीय
कार्यालय लातूर येथे लवकरच सुरु होणार असल्याची माहिती महामंडळाचे जिल्हा
व्यवस्थापक आर.टी. जिभकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे विभागीय
कार्यालय लातूर येथे सुरु करण्यात यावे. जेणेकरून लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि
हिंगोली जिल्ह्यातील समाजबांधवांची औरंगाबाद येथे विभागीय कार्यालयामध्ये जाताना
होणारी गैरसोय थांबेल, अशी मागणी काही सामाजिक संघटनांनी केली होती. या मागणीची
दखल घेत महामंडळ मुख्यालयाने कार्यवाही सुरु केली आहे.
मुख्यालयाने याबाबत पाठविलेल्या प्रस्तावाला संचालक मंडळाने 21
जून 2023 रोजी मंजुरी दिली आहे. तसेच प्रशासकीय कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. लवकरच
लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संत रोहिदास
चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाचे विभागीय कार्यालय सुरु होणार असल्याने समाज
बांधवांना लाभ होईल, असे श्री. जिभकाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले
आहे.
Comments
Post a Comment