लातूर जिल्ह्यातील बांबू लागवडीस येणार गती राज्याचे मनरेगा महासंचालकांच्या उपस्थित होणार शुक्रवारी कार्यशाळा
लातूर जिल्ह्यातील बांबू लागवडीस येणार गती
राज्याचे मनरेगा महासंचालकांच्या उपस्थित होणार शुक्रवारी कार्यशाळा
लातूर दि. 17 (जिमाका) : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत बांबू लागवडीस गती आणण्यासाठी व त्यांची व्याप्ती वाढविण्याबाबत राज्याचे मिशन मनरेगाचे महासंचालक नंदकुमार यांच्या उपस्थितीत चर्चा, बैठक, प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवार, दिनांक 18 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 10-30 वाजता दयानंद सभागृह, बार्शी रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या कार्यशाळेला जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सर्व कार्यालय प्रमुखांनी चर्चेकरिता सकाळी 9-30 वाजता उपस्थित रहावे. चर्चा संपताच या कार्यशाळेला सर्व सरपंच, सर्व कृषि सहाय्यक , मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, सर्व ग्राम सेवक, ग्रामविकास अधिकारी, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, सर्व वनपाल वन व सामाजिक वनीकरण, सर्व सहायक कार्यक्रम अधिकारी नरेगा, सर्व तांत्रिक सहायक नरेगा यांनी उपस्थित रहावे, या कार्यशाळेसाठी बांबू लागवड समितीचे सदस्य पाशा पटेल हेही उपस्थित राहणार आहेत. बांबू लागवड ते उत्पादन, विक्री यावरही मार्गदर्शन होणार आहे, त्यात योगेश शिंदे, संतोष राणे, सलीम सय्यद व एन. टी.पी. सी चे अधिकारी यांचा समावेश आहे. ही कार्यशाळा अत्यंत महत्वाची असून अपेक्षित असलेल्या सर्वांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे असे जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर - घुगे यांनी निर्देश दिले आहेत.
****
Comments
Post a Comment