लातूर तहसीलदार आस्थापनेवरील कोतवाल पदभरतीची परीक्षा पुढे ढकलली

 

लातूर तहसीलदार आस्थापनेवरील

कोतवाल पदभरतीची परीक्षा पुढे ढकलली

·        नवीन तारखेनुसार 3 सप्टेंबरला होणार परीक्षा

लातूर दि. 11 (जिमाका) : महसूल व वन विभागाच्या 5 सप्टेंबर, 2013 व 17 मे, 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार, तसेच जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार लातूर तहसीलदार यांच्या आस्थापनेवरील कोतवालांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु आहे. या पदासाठी 20 ऑगस्ट 2023 रोजी होणार परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती लातूरच्या उपविभागीय अधिकारी तथा तालुका निवड समितीच्या अध्यक्ष यांनी दिली आहे.

कोतवाल पदाची परीक्षा 20 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, यादिवशी शिक्षकांची टी.ई.टी. परीक्षा व इतर अनुषंगिक बाबींमुळे ही कोतवाल भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 3 सप्टेंबर 2023 रोजी होईल, असे लातूरच्या उपविभागीय अधिकारी तथा तालुका निवड समितीच्या अध्यक्ष यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु