राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री श्री. संजय बनसोडे 12 व 13 ऑगस्ट रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री श्री. संजय बनसोडे
12 व 13 ऑगस्ट रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर
लातूर, दि. 11 (जिमाका) : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री श्री. संजय बनसोडे हे शनिवार, दिनांक 12 ऑगस्ट, 2023 व रविवार दिनांक 13 ऑगस्ट, 2023 या दोन दिवसांच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे राहील.
शनिवार, दिनांक सकाळी 6-30 वाजता रेल्वे स्टेशन लातूर येथे आगमन. रेल्वे स्टेशन लातूर येथून मोटारीने निवासस्थानाकडे प्रयाण व लातूर येथे राखीव.
रविवार, दिनांक 13 ऑगस्ट, 2023 रोजी लातूर येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण. सकाळी 10-00 वाजता मौ. हत्तीबेट (देवर्जन) ता. उदगीर हत्तीबेट ‘ब वर्गीय’ पर्यटन स्थळ येथील विकास कामांचा भुमीपूजन समारंभ व देवर्जन भुषण पुरस्काराचे वितरण. सकाळी 12-00 वाजता ललित भवन मगंल कार्यालय, नळेगाव रोड, उदगीर येथे मराठा सेवा संघ, उदगीर व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, उदगीरच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक, शेतकरी व पत्रकार पुरस्कार सोहळा -2023 व शेतकरी मार्गदर्शन मेळावा. दुपारी 1-30 वाजता उदगीर तहसील कार्याल्याच्या मागे महसूल अधिकारी, कर्मचारी निवासस्थान बांधकाम कामाचा भूमीपूजन समांरभ. सांयकाळी 5-00 वाजता देगलूर रोड, उदगीर येथे डॉ. व्यंकटेश किशनराव वट्टमवार यांच्या नुतन वास्तुच्या गृहप्रवेश कार्यक्रमास उपस्थितीत. सांयकाळी 5-30 वाजता शिवाजी सोसायटी, उदगीर येथे डॉ. ओमप्रकाश जनार्दन पाटील यांच्या पाटील हॉस्पीटलला सदिच्छा भेट. सोयीनुसार उदगीर येथून लातूकडे प्रयाण करतील.
*****
Comments
Post a Comment