शीघ्र हस्तक्षेप केंद्रामधील आरोग्य शिबिरात 25 बालकांची तपासणी आणि उपचार

 लातूर दि. 15 (जिमाका) : थॅलेसेमिया, रक्ताचा कर्करोग, तीव्र अशक्तपणा असलेल्या शाळा व अंगणवाडीतील शून्य ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करण्यासाठी दर महिन्याचा दुसऱ्या शनिवारी स्त्री रुग्णालय परिसरातील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रात (डीईआयसी) आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. यामध्ये रक्ताचे आजार व कॅन्सरच्या संशयित रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येतात. 12 ऑगस्ट रोजी आयोजित शिबिरात 25 बालकांची तपासणी आणि उपचार करण्यात आले.

यामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ पथकाने संदर्भित केलेल्या थॅलेसेमियाच्या दहा आणि इतर आजार असलेल्या पंधरा बालकांचा समावेश होता. औरंगाबाद येथील बालरक्तरोग तज्ज्ञ (पीडियाट्रिक डर्मेटोलॉजिस्ट) डॉ. श्रद्धा चांडक यांची सेवा प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी निशुल्क उपलब्ध होत असून त्यांनी या बालकांची तपासणी करून त्यांचावर उपचार केले.

दर बुधवारी हार्मोन्सविषयक आजारांसाठी शिबीर

हार्मोन्सशी संबंधित आजारांविषयी शाळा व अंगणवाडीतील शून्य ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी व उपचारासाठी दर बुधवारी स्त्री रुग्णालय परिसरातील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रात (डीईआयसी) आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. यामध्ये हार्मोन्स तज्ज्ञ डॉ. विजय ढवळे यांची सेवा उपलब्ध करून देण्यात येते.

 जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा