आरोग्य सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करा - जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे

 आरोग्य सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करा

-         जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे


लातूर दि. 2
3 (जिमाका) : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत आरोग्य विभागाच्या विविध समितीच्या बैठका 22 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाल्या. आरोग्य सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागरसहायक जिल्हाधिकारी नमन गोयलजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदिप ढेले,                एस.एम.ओ. डॉ. अमोल गायकवाडअतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरेसहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगेजिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारेअधिष्ठाता  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी डॉ. सचिन जाधवनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडामहिला व बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेखसमाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यावेळी उपस्थित होते.

एन.एच.एम. नियामक मंडळएन.एच.एम. लेखा परिक्षण समितीलसीकरण समितीविषेश इंद्रधनुष्य मोहिम समितीप्रधानमंत्री मातृवंदना योजना सुकाणू समितीप्राणीजन्य आजार समितीवातावरण बदल समितीजिल्हा गुणवत्ता समितीएन.पी. .पी.सी.एफ.समिती15 वा वित्त आयोग समितीजन्म मृत्यू समितीबोगस वैद्यक व्यावसायीक प्रतिबंध जिल्हा पुनर्विलोकन समितीएल.सी.डी.सी. व ए.सी.एफ. मोहिमटी.बी. फोरम व कोमॉर्बीडीटी कमिटीआर. के. एस. के. समितीचा आढावा जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी घेतला.

गरोदर माता नोंदणी कमी असून रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांचे प्रमाणमाता मृत्यू रोखण्यासाठी त्वरीत उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या. सर्व बालकांचे लसीकरण पूर्ण होईल, याची दक्षता घ्यावी. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पथकामार्फत सर्व अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांची काटेकोर आरोग्य तपासणी करून डोळेकानदात व हृदयरोग यांचे लवकर निदान व उपचार करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रसूती रुग्णसर्प दंशाचे रुग्ण यांना विनाकारण संदर्भसेवा देण्यात येऊ नये, असे त्यांनी सांगितले.

सद्यस्थीतीत जिल्ह्यात माता मृत्यू, बाल मृत्यू होऊ नयेअसंसर्गजन्य आजारापासून नागरिक दूर रहावेत, यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपाययोजना राबवाव्यात. वाड्यावस्त्यातांडावंचित समूहातील घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहावे. आवश्यकतेप्रमाणे इतर विभागाची मदत घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केल्या.

*******

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा