"महिला आयोग आपल्या दारी" या उपक्रमाव्दारे राज्य महिला आयोगाची लातूर येथे जनसुनावणी

                                                   "महिला आयोग आपल्या दारी" या उपक्रमाव्दारे

राज्य महिला आयोगाची लातूर येथे जनसुनावणी

 

लातूर दि. 25 (जिमाका) : महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता "महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाव्दारे लातूर जिल्ह्यात दिनांक २८ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता डि.पी.डि.सी. सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे जनसुनावणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर जन सुनावणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिकस्तरावर आपले म्हणणे                        मांडण्याकरीता तक्रारदार पिडीत महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी. कोणतीही पिडीत महिला कोणतीही पूर्व सुचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहुन लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकेल. याकरीता जिल्हातील सर्व महिलांना आवाहन करण्यात येते की, आपली कोणत्याही शासकिय विभागाकडील व कौटुंबिक हिंसांचार संबंधीच्या प्रलंबित असलेल्या तक्रारीबाबत किंवा नवीन तक्रार लेखी नोंदवून सुनावणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर-घुगे जिल्हाधिकारी व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी देवदत्त गिरी यांनी केले आहे.

**** 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु