भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 9 ऑगस्ट रोजी प्रत्येक कार्यालयात घेतली जाणार शपथ
लातूर, दि. 8 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ अंतर्गत संपूर्ण देशभर एक विशेष मोहिम हाती घेतली आहे. 9 ऑगस्ट क्रांतीदिनापासून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळा सुरू होत असून केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशभर याचे नियोजन केले गेले आहे. याअंतर्गत 9 ऑगस्ट रोजी प्रत्येक शासकिय, निमशासकिय, स्थानिक स्वराज्य संस्था शाळा-महाविद्यालय, शासकीय महामंडळे आदी सर्व ठिकाणी सकाळी दहा वाजता पंचप्राण शपथ घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी दिले.
भारतीय स्वातंत्र्याचे
मूल्य डोळ्यासमोर ठेवून घेतल्या जाणाऱ्या शपथेचा मजकूर शासनातर्फे निर्गमीत केला
आहे. ‘आम्ही शपथ घेतो की, भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे
स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारसाचा
गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान
बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू’ असा शपथेचा मजकूर सर्व कार्यालयांना पाठवून त्या-त्या विभाग
प्रमुखांना आदेश देण्यात आले आहेत.
*****
Comments
Post a Comment