कृषि विभागाची शिवणी खुर्द येथे शेतीशाळा उत्साहात

 

कृषि विभागाची शिवणी खुर्द येथे शेतीशाळा उत्साहात


लातूर, दि. 11 (जिमाका) :
 तालुक्यातील शिवणी खुर्द येथे कृषि विभागाच्यावतीने तृणधान्य अभियानांतर्गत शेतीशाळेमध्ये विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

मंडळ कृषि अधिकारी एस. जे. कडवकर, कृषि सहाय्यक सचिनकूमार शिंदे, मनीषा रेनापुरकर, अलका कुसभागे, प्रियंका गिरी व संतोष पुरी यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ज्वारी पिकांचे पीक परिसंस्था पृथकरणचे शेतकऱ्यांकडून प्रात्यक्षिक घेण्यात आले. ज्वारी पिकावरील शत्रू कीड व मित्र कीड यांची ओळख करून देण्यात आली. ज्वारी या पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन, कृषि विभागाच्या विविध योजना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य, तृणधान्याचे मानवी आहारातील महत्त्व, कृषक ॲप, फळबाग लागवड, तूर पिकातील कीड व रोग व्यवस्थापन, फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले.

मंडळ कृषि अधिकारी एस. जे. कडवकर यांनी सोयाबीन कीड व रोग एकात्मिक व्यवस्थापण याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी शिवणी खुर्द गावचे उपसरपंच एच.जी.मोरे, पोलीस पाटील एन.पी गुणाले यांच्यासह बोरी व शिवणी खुर्द गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु