महसूल सप्ताह निमित्त 127 अधिकारी, कर्मचाऱ्यांची लातूरमध्ये आरोग्य तपासणी
महसूल सप्ताह निमित्त 127 अधिकारी,
कर्मचाऱ्यांची लातूरमध्ये आरोग्य तपासणी
लातूर, दि. 4 (जिमाका) : लातूर तहसील कार्यालयामार्फत महसूल सप्ताह निमित्त तहसील कार्यालयातील 127 अधिकारी, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील जी. यादव यांच्या
हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे -विरोळे, प्रभारी
तहसीलदार गणेश सरोदे, नायब तहसीलदार भीमाशंकर बेरोळे, मंडळ अधिकारी खंदाडे, तलाठी
तावशीकर, यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरासाठी 4 डॉक्टर आणि त्यांची टीम असे 27 जण होते. त्यात कव्हा आरोग्य प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माया कापसे, समुदाय अधिकारी डॉ. किरण कऱ्हाळे, चिखुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. तोरणेकर एस.बी., मुरुड आकोलाचे समुदाय अधिकारी डॉ. वर्षा गव्हाणे, खोपेगावचे सीएसचओ चंद्रकिशार जाधव, आरोग्य सहाय्यक यादव डी.एम., श्री. स्वामी, श्री. कदम विलास, श्री. नरहरे , निर्मिती जाधव व एच.एच.एल.टीम, श्री. कांबळे बी.एल. आदी उपस्थित होते.
****
Comments
Post a Comment