वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत माटेफळ येथे वृक्ष लागवडीस प्रारंभ
लातूर, दि. 7 (जिमाका) : वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत वृक्ष लागवड सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आदर्श गाव योजनेसाठी निवड झालेल्या लातूर तालुक्यातील माटेफळ येथे रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीस प्रारंभ झाला.
सरपंच अलका विठ्ठल खोसे, उपसरपंच
संजय शिंदे, लातूर पंचायत समितीचे गट विकास
अधिकारी तुकाराम भालके, तालुका कृषि अधिकारी दिलीप राऊत, कृषि
पर्यवेक्षक योगेश मुळजे,
कृषि सहाय्यक वीरनाथ सूर्यवंशी, ग्रामसेवक श्रीकांत मुंडे, नवनाथ
शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शुभम खोसे, बापू खोसे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
माटेफळ गावात माटेफळ गावातील सार्वजनिक ठिकाणी, तसेच वैयक्तिक
शेतकऱ्याच्या शेतामध्ये सीताफळ या फळ पिकाची लागवड करण्यात आली. यासोबतच गावातील
आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
*****
Comments
Post a Comment