समाज कल्याण क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था, समाजसेवक यांना मिळणार पुरस्कार
समाज कल्याण क्षेत्रात विशेष कार्य
करणाऱ्या
नोंदणीकृत स्वयंसेवी
संस्था, समाजसेवक यांना
मिळणार पुरस्कार
लातूर, दि. 4 (जिमाका) : समाज कल्याण
क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व समाजसेवक यांना
दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानुसार सन 2019-20, 2020-21, 2021-22 व सन
2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारासाठी 15 ऑगस्ट 2023
पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
सन 2019-20, 2020-21, 2021-22 या वित्तीय
वर्षासाठी यापूर्वी अर्ज केला असल्यास नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र, चालू वर्षासाठीचे पोलीस विभागाचे चारित्र्य पडताळणी अहवाल तत्काळ समाज
कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडे सादर करावा. पूर्वी अर्ज केलेल्या व्यक्तींनी
पुन्हा अर्ज केल्यास त्या अर्जाचाही विचार करण्यात येईल. ज्या वर्षांसाठी व ज्या
पुरस्कारांसाठी अर्ज करण्यात येत आहे, त्या वर्षासाठी त्या पुरस्कारासाठी विहित केलेल्या अटींची पुर्तता करणे
आवश्यक राहील. तसेच पुरस्कारासाठी 01 जानेवारी ते 31 डिसेंबर अशी गणना विचारात
घेण्यात येईल.
इच्छुक संस्था व व्यक्ती यांनी
पुरस्कारासाठी सहायक आयुक्त, समाज कल्या ण कार्यालयाकडे दिनांक 15 ऑगस्ट 2023 पर्यंत
अर्ज करावेत. विहीत नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, लातूर यांच्या
कार्यालाय्त उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी समाज कल्यानण निरिक्षक संदेश घुगे
(भ्रमणध्वनी क्र. 9405446216), तालुका समन्वयक गंगाधर जोगदंड (भ्रमणध्वनी क्र. 7620019484) यांच्यामशी
अथवा कार्यालयाच्या 02382-258485 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment