जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यास 25 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे

अर्ज भरण्यास 25 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 

लातूर : दि.17 (जिमाका) येथील जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता इयत्ता सहावीत प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज 17 ऑगस्ट, 2023 पर्यत भरण्याची मुदत वाढ मिळाली होती. नवोदय विद्यालय समिती, नवी दिल्ली ने ही मुदत वाढवून ती दिनांक 25 ऑगस्ट, 2023 केली आहे. इच्छुक ऑनलाईन अर्ज दिनांक 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत भरु शकतात . प्रवेश परीक्षा दि.20 जानेवारी, 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

 ऑनलाईन प्रवेशअर्ज www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर निशुल्क भरता येतो. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता पाचवी लातूर जिल्ह्यातील मान्यता प्राप्त शाळेतून शिक्षण घेत असलेले विद्यार्थी  (जन्मतारीख 1 मे, 2012 ते 31 जुलै, 2014 (दोन्ही दिवस धरुन ) दरम्यान असणारे प्रवेश अर्ज भरण्यास पात्र असतील. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना पाचवीत शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र, विदयार्थ्याचा फोटो, पालकांची व विदयार्थ्याची स्वाक्षरी आधार माहिती तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले रहिवासी प्रमाणपत्र आदि. जेपीजी फॉरमॅटमध्ये 10 ते 100 के बी साईजमध्ये अपलोड करण्यासाठी तयार ठेवणे आवश्यक आहे.

 ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना काही चुका झाल्या असल्यास त्या दुरुस्त करण्याकरिता दि. 26 ऑगस्ट, 2023 व दि. 27 ऑगस्ट, 2023 www.navodaya.gov.in या संकेतस्थळावरुन करता येईल. या दुरुस्तीत परीक्षेचे माध्यम जन्मदिनांक, लिंग ( मुलगा / मुलगी / इतर) क्षेत्र (शहरी ग्रामीण) प्रवर्ग ( इतर मागास, सामान्य, अनु जाती, अनु जमाती,  दिव्यांग यामध्ये बदल करता येतो.

विद्यार्थी आणि पालकांचा रहिवास हा लातूर जिल्ह्यात असणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षेतून निवड झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश घेताना विद्यार्थी व पालक लातूर जिल्ह्याचे रहिवासी असल्याचे तहसीलदार यांच्याकडून प्राप्त केलेले रहिवाशी दाखला जमा करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत जवाहर नवोदय विदयालय लातूर येथील प्रवेश परीक्षेचे प्रभारी बी डी शेख 9817834930 किंवा व्ही एच खिलारे 9860568840 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय,लातुरचे प्राचार्य पी जे डी विल्यम यानी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु