उदगीर, जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील खराब झालेल्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी - राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे बांधकाम विभागाला निर्देश
उदगीर, जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील खराब झालेल्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी * राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे बांधकाम विभागाला निर्देश लातूर दि.31 ( जिमाका ) मागील पावसाळ्यात उदगीर जळकोट ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले असुन ते तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम ,पर्यावरण पाणी पुरवठा, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज दिले. उदगीर जळकोट तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, विभागातील विविध विकास कामा संदर्भात लातूर येथील विश्रांमग्रहात बैठक घेतली.त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. याबैठकीला सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता एम एम पाटील, उप अभियंता एल डी देवकर , जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता लवटे (मुख्यमंत्री सडक योजने) प्रधान मंत्री गाव सडक योजनाचे कार्यकारी अभियंता श्री मुकादम जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभिंयता श्री. माह्त्रे कार्यकारी अभियंता रोहित जगताप यासोबतच उदगीर पंचायत समितीचे सभापती प्रा.शिवाजी मुळे ,उदगीरचे नगरसेवक...