आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमा निमित्त मौजे कातपुर, मळवटी, भडी, भातांगळी येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न
आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमा निमित्त
मौजे कातपुर, मळवटी,
भडी, भातांगळी येथे
कायदेविषयक जनजागृती
शिबीर संपन्न
लातूर,दि.29(जिमाका):- मा. सर्वोच्च
न्यायालय व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा
प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. 02 ऑक्टोबर 2021 ते दि. 14 नोव्हेंबर 2021
या कालावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त लातूर जिल्हयामध्ये गावोगावी
कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
कायद्याची जनजागृती करण्यासाठी आज मौजे कातपुर,
मळवटी, भडी, भातांगळी येथे भव्य कायदेविषयक शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमास कातपुर
येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन गावचे सरपंच विष्णु बालासाहेब देशमुख होते. प्रमुख
पाहुणे म्हणून सुधीर देशमुख होते, तर मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे
पॅनल अॅड. आर. के. चव्हाण व अॅड. अशोक जोंधळे हे होते. अॅड. आर. के. चव्हाण यांनी ज्येष्ठ
नागरिकांचा कायदा व कौटुंबिक हिंसाचार याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन उपस्थित गावकऱ्यांना
दिली.
तसेच अॅड. अशोक जोंधळे यांनी बालकांच्या शिक्षणाचा
अधिकार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण याविषयी माहिती दिली. त्यांनी शिक्षणाचे महत्व
पटवून सांगताना मोफत व सक्तीचे शिक्षण बालकांना दिले जाते, शिक्षणामध्ये कायद्याचे
शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन ग्रामपंचायतचे सदस्य भास्कर तात्याराव
देशमुख यांनी केले तर आभार ज्येष्ठ नागरिक काकासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास
तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, आशा कार्यकर्त्या, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील
नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
मळवटी येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून
गावच्या सरपंच कदम या उपस्थित होत्या. प्रमुख
वक्ते म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक आकाश मदने यांनी लोकअदालतचे
महत्व सांगताना, लोकअदालतमध्ये आपला वेळ व पैसा वाचतो व लवकर निकाल मिळतो असे सांगीतले.
विधी स्वयंसेवक श्रीनिवास फुलसे यांनी स्त्री-पुरुष लिंग समानता या विषयी माहिती दिली.
तसेच विधी स्वयंसेवक चैतन्य मोरे यांनी शिक्षणाचा अधिकार याबद्दल माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीनिवास फुलसे
यांनी केले तर सुत्रसंचालन माळी,ग्रामसेवक यांनी केले व आभार सरपंच श्री कदम यांनी
मानले. या कार्यक्रमास गावातील नागरिक, सरपंच, ग्रामसेवक आदीची. उपस्थित होते. कायदेविषयक
शिबीर यशस्वी होण्यासाठी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांचे विशेष सहकार्य लाभले.
भडी येथे या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणुन
गावच्या सरपंच सौ. बाचपल्ले सुनंदाबाई या होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक
म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर चे पॅनल अॅड. सुनैना बायस व विधी स्वयंसेवक पृथ्वीसिंह बायस हे
उपस्थित होते. अॅड. सुनैना बायस यांनी कौटुंबिक हिंसाचार व बेटी बचाओ बेटी पढाओ या
विषयी मार्गदर्शन केले. तसेच विधी स्वयंसेवक,
पृथ्वीसिंह बायस यांनी मध्यस्थी व जिल्हा विधी
सेवा प्राधिकरण याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. आर. सी. पाटील
यांनी केले तर सुत्रसंचालन स्वाती बिडवे, अंगणवाडी शिक्षिका यांनी केले व रंजना पांचाळ
यांनी आभार मानले. यावेळी गावातील ग्रामस्थ, अंगणवाडी शिक्षिका, ग्रामपंचायत सदस्य
उपस्थित होते.
भातांगळी येथील कायदेविषयी शिबीरास अध्यक्ष
म्हणून गावचे सरपंच परमेश्वर पाटील उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेसाहेब
पाटील, दिलीप मुक्ता, ग्रामपंचायत सदस्य हे होते. मार्गदर्शक म्हणून पॅनल अॅड. सुनैना
बायस व विधी स्वयंसेवक पृथ्वीसिंह बायस हे उपस्थित होते. अॅड. सुनैना बायस यांनी कौटुंबिक
हिंसाचार व बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर सविस्तर असे विवेचन केले. तसेच विधी स्वयंसेवक, पृथ्वीसिंह बायस यांनी मध्यस्थी
व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.
आर. सी. पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन लिंबराज बोळंगे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार सरपंच परमेश्वर पाटील यांनी
व्यक्त केले. सदरील कार्यक्रमास गावचे सरपंच,ग्रामसेवक, ज्येष्ठ नागरिक , ग्रामस्थ
व महिला ही उपस्थित होती.
तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा
विधी सेवा प्राधिकरण, लातूर येथील न्यायिक कर्मचारी, जिल्हा न्यायालयाचे अॅड., जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणचे पॅनल अॅड. विधी स्वयंसेवक तसेच उपरोक्त गावातील ग्रामसेवक, सरपंच,
उपसरपंच, अंगणवाडी शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न
केला.
****
Comments
Post a Comment