नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेवून लसीकरणाचा लाभ घ्यावा --- राज्यमंत्री संजय बनसोडे

 

नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेवून

लसीकरणाचा लाभ घ्यावा 

                                  --- राज्यमंत्री संजय बनसोडे

 

   


नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेवून

लसीकरणाचा लाभ घ्यावा 

                                  --- राज्यमंत्री संजय बनसोडे

 

    लातूर दि.9 ( जिमाका ):- राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यामध्ये मिशन कवच कुंडल ही मोहीम राबविली जात आहे. नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेवून लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 18 वर्षावरील मिशन कवच कुंडल मोहिमेतंर्गत सर्व नागरिकांनी लसीकरण केंद्राला भेट देवून लसीकरण करुन घ्यावे. नागरिकांनी या मोहिमेतील लसीकरणाचा लाभ घ्यावा. तसेच सर्वांनी लस घ्यावी. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. प्रत्येक शासकीय अधिकारी , कर्मचारी तसेच मित्र परिवार असेल त्यांच्या माध्यमातून किमान 5 लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

00000

  


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु