मौजे कव्हा येथे कायदेविषयक शिबीर संपन्न*
*मौजे कव्हा येथे कायदेविषयक शिबीर संपन्न
लातूर दि.13(जिमाका):-सर्वोच्च न्यायालय व
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. 2 ऑक्टोबर
2021 ते 14 नोव्हेंबर 2021 या कलावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत
लातूर जिल्हयामध्ये गावोगावी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात येत आहेत.
त्यानिमित्त निमित्त मोजे कव्हा येथे आजादी का अमृत महोत्सवांतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन
शिबीर संपन्न झाले.
कव्हा येथे सार्वजनिक उपयोगिता सेवांवर जागरुकता
शिबीर यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लोकन्यायालय, महिलांचे अधिकार, महिला हिंसाचार
कायदा, कृषिविषयक योजना, शेतकरी योजना या विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी श्रीमती एस.डी.
अवसेकर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव
कव्हेकर, ॲड. अंबिका पाठक , ॲड. पाठक, ॲड. भुरे ,ॲड. स्वाती तोडकरी, ॲड. चिंते, ॲड.
निलेगावकर, ॲड.कलशेट्टी, ॲड.देवताळकर, ॲड.आराध्ये, अरुण कांदे, मुख्याध्यापिका, स्वामी
दयानंद विद्यालय,अनंत सुर्यवंशी, मौजे कव्हा येथील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत
सदस्य, बचत गटाचे सचिव तसेच कव्हा, कन्हेरी, कातपूर, सिकंदरपूर, चांडेश्वर, पेठ येथील
ग्रामसेवक, चांडेश्वरचे उपसरपंच, नागरिक, महिला व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी श्रीमती एस.डी.
अवसेकर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी
“बेटी बचाओ, बेटी
पढाओ” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे
अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर यांनी तळागाळातील जनतेपर्यंत कायद्याचे ज्ञान
व घटनेने दिलेले अधिकार या विषयी माहिती होण्यासाठी असे कार्यक्रम होणे आवश्यक असल्याचे
सांगितले. ॲड. नंदकिशोर पाठक यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विषयी माहिती दिली.
ॲड. भुरे यांनी लोकन्यायालय विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ॲड. स्वाती तोडकरी यांनी
महिला व बालकांचे कायदेविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रामसेवक अनंत सुर्यवंशी
यांनी कृषिविषयक योजना व शेतकरी योजनेबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. नंदकिशोर पाठक
यांनी केले. या प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. अंबिका पाठक यांनी केले. तर आभार प्रदर्शन कव्हा ग्रामपंचायतीचे
उपसरपंच किशोर घार यांनी केले.
कायदेविषयक जनजागृती घडवून आणण्यासाठी व कार्यक्रमाच्या
संपन्नतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर येथील न्यायिक कर्मचारी, पॅनल विधीज्ञ,ग्रामपंचायत
सदस्य, ॲड. नंदकिशोर पाठक, ॲड.अंबिका पाठक, ॲड.मेघा पाटणकर यांनी व कव्हा गावचे ग्रामसेवक
अनंत सुर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
****
Comments
Post a Comment