अतिवृष्टीच्या संकाटात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी सर्वोतोपरी मदत करणार -राज्य मंत्री संजय बनसोडे

 

अतिवृष्टीच्या  संकाटात शासन शेतकऱ्यांच्या

  पाठिशी सर्वोतोपरी मदत करणार

                                                             -राज्य मंत्री संजय बनसोडे

 

                लातूर,दि.1 (जिमाका) जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना राज्य शासन जास्तीत जास्त आर्थिक मदत करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम पाणी पुरवठा व स्वच्छता पर्यावरण भूकंप पुनर्वसन संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.

                राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज उदगीर, जळकोट तालुक्यातील देवर्जन ,वाढवणा, बेळसांगवी,ढोरसांगवी,लाळी, कुणकी  गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली शेतकऱ्यांना धीर दिला  व नंतर तालुक्यातील पुर परिस्थितीचा आढावा घेतला  यावेळी जळकोटचे अर्जुन आगलावे, मनमथ अप्पा किडे, मारुती पांडे यासोबतच तहशीलदार सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी श्री ढोकणे ,कृषी अधिकारी संजय नाबदे इतर अधिकारी उपस्थित होते .

                यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांनी सरसकट शेतात जावून पंचनामे करावे , व लवकरात लवकर सर्व अहवाल सादर करण्याचे निर्देश यांनी दिले. यावेळी  या पुर परिस्थितीमुळे वीज वितरण कंपनीच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना त्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे निर्देश दिले. तालुक्यातील रस्ते व पुल याबाबत झालेल्या नुकसानीचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आढावा घेतला पुर परिस्थितीने बंद झालेले  वाहतुकीचे रस्ते तात्काळ सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले सोबतच पुरामुळे शहरातील पाणी पुरवठा योजनेला काही परिणाम झाला आहे का याचा आढावा घेऊन पाणी पुरवठा योजना सुरू करण्याच्या सुचना करण्यात आल्या. यावेळी विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी होईल यासाठी प्रयत्न केला जाईल असे संजय बनसोडे यांनी सांगितले.

 




Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा