कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान

 

कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या

वारसांना सानुग्रह अनुदान

 

       लातूर दि.21(जिमाका):- सर्वोच्च न्यायालयाचे दिनांक 30 जून, 2021 रोजी दिलेल्या आदेशानुसार व त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिनांक 11 सप्टेंबर, 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रु. 50 हजार एवढे सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केलेले आहे. त्यासाठी अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती महाराष्ट्र शासनाकडून लवकरच अधिसूचित करण्यात येणार असून त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

        त्यानुसार प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी त्यांचे पत्र दिनांक 12 ऑक्टोबर, 2021 अन्वये निर्देशित केलेनुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रु. 50 हजार एवढे सानुग्रह अनुदान वितरीत करण्यासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता:-जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण- जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, लातूर समुपदेशन कक्ष, 3 रा मजला, लातूर- 413512, संपर्क क्रमांक-02382-223002, वेब साईट-www.latur.gov.in ई-मेल- ddmolatur@gmail.com , csnrhmlatur@rediffmail.com  , moh.mclatur@gmail.com असा आहे.

 

                                                            ***

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा