मौजे गाधवड तसेच बालन्यायमंडळ येथे जनजागृती अभियानांतर्गत भव्य कायदेविषयक शिबीर संपन्न

 

मौजे गाधवड तसेच बालन्यायमंडळ येथे

जनजागृती अभियानांतर्गत भव्य कायदेविषयक शिबीर संपन्न

 

लातूर दि.22(जिमाका):-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर यांच्या विद्यमाने 21 ऑक्टोबर 2021 रोजी आजादी का अमृत महोत्सव ही संकल्पना सर्वार्थाने जनमानसात रुजविण्यासाठी भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून गाधवड येथील ग्रामसेवक श्री.पटवारी व प्रमुख पाहूणे म्हणुन सरपंच उपस्थित होते. भारत देशाला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्षाचा कालावधी लोटून देखील गावखेडयामध्ये प्रचलित कायद्याबाबतचे अज्ञान असल्यामुळे होत असलेल्या अन्यायावर कायद्याच्या माध्यमातुन न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जनजागृती ची आवश्यकता आहे. म्हणुनच त्याअंतर्गत नुकतेच शिबीर आयोजित करण्यात आलेले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणुन ॲड. उमाकांत राऊत व ॲड. बिना कांबळे हे स्वंयस्फुर्तीने कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते.

या कार्यक्रमास ॲड. उमाकांत राऊत यांनी कायदेविषयक जनजागृती करताना आपले वारसा हक्क कोणते आहेत. वारसा हक्काने आपणास काय काय मिळु शकते व त्यासाठी कायद्याची कशाप्रकारे मदत घेता येईल याबाबतचे विस्तृत विवेचन केले.

तसेच त्यांनी आपल्या व्याख्यानात बालकासांठीचे न्याय त्यांच्या बालकांविषयीची काळजी व संरक्षण अधिनियम तसेच शिक्षणाचा हक्क व अधिकार याबाबत संबोधित केले. तसेच आजच्या काळात जेष्ठ नागरिकांवर अन्याय होत असल्याची बाब समोर आल्यामुळे त्याबाबतच्या ठोस उपाय योजना व जेष्ठ नागरिकांच्या अधिकाराबाबतची माहिती दिली.

  तसेच या शिबीरास उपस्थित असलेल्या व सातत्याने लोककल्याणाच्या बाबतीत आग्रही असलेल्या ॲड. बिना कांबळे यांनी देखील शिबीरामध्ये आपले अमुल्य असे मार्गदर्शन केले. ॲड. बिना कांबळे यांनी घराघरात होणारे किंवा घरगुती महिलांवरील होणारे अत्याचार कसे रोखता येवु शकतात व त्यांना प्रचलित कायदा कोणत्या प्रकारे मदत करु शकतो याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन केले. समुपदेशनाचा मार्ग पसंत नसेल किंवा समुपदेशाने अशी प्रकरणे मिटत नसतील तर महिलांना फौजदारी व्यवहार संहिता कलम 125 याव्दारे महिलेल्या उपजिवीकेसाठी पोटगी (खावटी) मासिक रोख रकमेच्या स्वरुपात मिळु शकते याची माहिती दिली. कलम भा.द.वी. कलम 498 अंतर्गत घरगुती छळाविरुध्द दाद मागता येते याचीदेखील माहिती दिली.

तसेच ॲड. बिना कांबळे यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओया योजने अंतर्गत मुलींच्या शिक्षणाचे महत्व विषद करुन भृण हत्या रोखण्यासाठी अत्यावश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन जनसमुदायास केले. तसेच बलात्कार पिडीत महिला व मुलीस प्रचलित कायद्याच्या कलम 376 सारख्या गंभीर गुन्हयातील महिला व मुलीस त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी शासनाकडून  देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती यावेळी दिली.

तसेच सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ग्रामसेवक श्री. पटवारी यांनी ग्रामपंचायतीमधील शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा व ग्रामपंचायतीकडे असलेल्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड. ग्रामस्थाने आपला अमुल्य वेळ देवुन उपस्थिती नोंदविली त्यात महिलांची व विद्यार्थ्यांची वाखानन्या योग्य होती.तसेच बालन्याय मंडळ, लातूर येथे वरील कार्यक्रमाचे आयोजन करुन बाल गुन्हेगारांच्या पालकांना पाचारण करण्यात आले होते.आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत्‍ बालगुन्हेगारी कशी रोखता येईल या विषयी विस्तृत माहिती बाल गुन्हेगारांच्या पालकांना ॲड. गायत्री नल्ले यांनी दिली.

तसेच ॲड. चिंते यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देवून आजचे बालक उद्याचे सुजान नागरिक कसे होतील व देशाच्या उन्नतीसाठी बालक किती महत्वाचे घटक आहेत या बद्दलचे आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून न्या.ए.ए. पुंउ अध्यक्ष, बालन्याय मंडळ, लातूर व प्रमुख पाहुणे म्हणुन ॲड.स्वाती तोडकरी उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर येथील न्यायिक कर्मचारी व पॅनल विधीज्ञ यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु