संसाधन व्यक्ती पदासाठी 11 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करावेत
संसाधन व्यक्ती
पदासाठी
11 ऑक्टोबर पर्यंत
अर्ज करावेत
लातूर,दि.5 (जिमाका):-आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपूरावा/हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासूची (Panel of Resource Persons) तयार करावयाची आहे. त्यासाठी या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनूसार अर्ज मागविण्यात येत असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
पदनाम संसाधन व्यक्ती (Resource
Persons) शैक्षणिक अर्हता -नामांकित राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय विद्यापीठ/संस्था यांचे कडील अन्न तंत्रज्ञान/अन्न अभियांत्रिकी मधील पदविका/पदवी असावी.अनुभव-अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन / वृध्दी, नविन उत्पादन विकसीत करणे, उत्पादनाच्या गुणवत्तेची हमी अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंदर्भातील 3 ते 5 वर्षाचा अनुभव असावा.
या पदाकरिता अर्ज सादर करण्याचा अंतीम दिनांक-11ऑक्टोबर 2021 असून अर्ज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,लातूर कार्यालयामध्ये कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत स्विकारले जातील. योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता परिक्षमिक (मानधन) व इतर अटी व शर्ती या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर या कार्यालयात उपल्ब्ध आहेत. तसेच कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in यावर सुध्दा उपलब्ध आहेत. या पदासाठी संस्था पात्र असणार नाहीत, असेही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले
आहे.
****
Comments
Post a Comment