अपघात टाळण्यासाठी व्हॅाटअप क्रमांक 9699403776 वर संपर्क साधावा

 

अपघात टाळण्यासाठी व्हॅाटअप क्रमांक

9699403776 वर संपर्क साधावा

 

लातूर दि.12(जिमाका):- रस्ता सुरक्षा अंतर्गत अपघात टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तयार केलेला Whatsapp क्रमांक 9699403776 असुन या क्रमांकावर  अपघात टाळण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी लातूर यांनी  केले आहे.

रस्त्यावर   वाहन चालवित असताना एखादे वाहन  धोकादायक रित्या वाहतूक नियमाचे उल्लंघन करुन चालताना आढळल्यास, एखादया ठिकाणी अपघात झाला अथवा अपघात होण्याची शक्यता असल्यास तसेच रस्त्यावरील रस्ते विषयक रचना अपघातास कारणीभुत ठरत असल्यास त्याची सविस्तर माहिती वरील भ्रमणध्वनी क्रमांक / Whatsapp क्रमांकावर छायाचित्रासह पाठवल्यास अपघाताचे प्रमाण कमी करणे कामी संबंधीत शासकीय यंत्रणेस अवगत करता येईल व अपघातग्रस्त व्यक्तीला मदत मिळू शकेल असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                             ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु