जिल्हयातील सर्व शाळा पूर्ववत सुरु पुन्हा एकदा शाळेत किलबिलाट…. कोरोनाच्या त्रिसुत्रीचे पालन करावे

 

जिल्हयातील सर्व शाळा पूर्ववत सुरु

 

·        पुन्हा एकदा शाळेत किलबिलाट….

·        कोरोनाच्या त्रिसुत्रीचे पालन करावे

              लातूर,दि.4 (जिमाका) :-मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद स्वरुपामध्ये होती.ती आज शासनाने शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. पुन्हा एकदा शाळेमध्ये  किलबिलाट सुरू झाला आहे. व शाळा पुर्ववत सुरु करण्यात आलेले आहेत.

                  लातूर शहरातील देशिकेंद्र माध्यमिक विद्यालय, सरस्वती विद्यालय व ग्लोबल नोलेज पब्लिक स्कूल येथील राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे  यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ स्वागत केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, शिक्षणाधिकारी श्रीमती तृप्तीताई अंधारे, मकरंद सावे यांची उपस्थिती होती.

                  यावेळी देशिकेंद्र शाळेचे मुख्याध्यापक, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शेळके,ग्लोबल नोलेज पब्लिक स्कूलचे श्री. बिराजदार, सुजित बिराजदार  शिक्षक,शालेय कर्मचारी, सचिव संजय शेटे, प्रशांत पाटील, माजी महापौर जमील अख्तर मिस्त्री,माजी नगरसेवक नवनाथ आल्टे, सामाजिक न्याय विभागाचे राहुल कांबळे, रेखाताई कदम,   अॅड.निशांतजी वाघमारे, मनिषा कोकणे,  विशाल  विहीरे, रामभाऊ रायेवार, मुन्नातळेकर, बंटी राठोड, माहिती तंत्रज्ञान विभागाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष डी.उमाकांत आदी उपस्थितीत होते.









Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा